पंजाबराव यांचा मोठा हवामान अंदाज; या तारखेपासून राज्यात मोठ्या पावसाला सुरुवात


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे राज्यामध्ये पावसाला कधीपासून सुरुवात होणार. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतीकामांना देखील वेग आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खुरपणी फवारणी आणि शेतीचे इतर कामे ही आता जोरात होऊ लागलेले आहेत. Panjabrao Dakh Havaman Andaj

पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच मध्यंतरी जुलै महिन्यामध्ये भरपूर असा पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाल्यामुळे पूर परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. यामुळे शेत पिकांचे सोयाबीन कापूस आणि बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे हा पाऊस कधी कमी होणार असा देखील प्रश्न शेतकरी समोर उपस्थित राहिला होता. आता पावसाने विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे शेती कामांनाही वेग आलेला आहे. परंतु यात संदर्भात जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी एक मोठी माहिती दिलेली आहे. राज्यातील हवामानाबाबत पंजाबराव काय म्हणतात आपण सविस्तरपणे जाणून घेऊ.

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात येत्या काही दिवसात हवामान कोरडे राहणार आहे. ११ ऑगस्ट पासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची उघड दीप पाहिला मिळणार आहे. तर काही ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. अनेक ठिकाणी कडक ऊन देखील पडणार आहे.

पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

पंजाबराव यांचा हवामानाबाबत मोठा खुलासा

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील हवामानामध्ये मोठा बल होणार आहे . अनेक भागांमध्ये पावसाची विश्रांती पाहायला मिळणार आहे. राज्यातील बीड, जालना, लातूर, परभणी, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, सोलापूर, धाराशिव, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यामध्ये खडक ऊन पडणार आहे.

तसेच राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भामध्ये मध्यंतरी चांगला पाऊस पडला होता. यामुळे येथील शेतकऱ्यांना पावसाचे विश्रांती हवी होती. त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी ही बातमी आनंदाचे ठरणार आहे या ठिकाणी कडक सूर्यदर्शन दिसणार आहे.

तसेच पंजाबराव यांनी शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज दिला असला तरी पंजाबराव यांनी येत्या काळात काही जिल्ह्यात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील काही भागात 17 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे.

तसेच राज्यातील अकोला, अमरावती, जळगाव, नंदुरबार, धुळे, नागपूर, वर्धा, अचलपूर, परतवाडा, बुलढाणा, अकोट या भागांमध्ये 17 तारखेपर्यंत चांगल्या पावसाच्या सरी बरसत राहणार आहे. यानंतर राज्याच्या हवामानामध्ये मोठा बदल होणार आहे.

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र बंगालच्या खाडीमध्ये तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात आणि कर्नाटक मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 20 ऑगस्टपासून ते 2 सप्टेंबर पर्यंत पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. यामुळे 19 ऑगस्टपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांचे कामे लवकरात लवकर उरकून घ्यावे अशी देखील पंजाबराव यांनी स्पष्ट केलेले आहे. तसेच पंजाबराव यांनी दिलेला हवामान अंदाज किती खरा ठरतो आता याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

6 thoughts on “पंजाबराव यांचा मोठा हवामान अंदाज; या तारखेपासून राज्यात मोठ्या पावसाला सुरुवात”

Leave a Comment

error: Content is protected !!