मोठी बातमी ‘लाडकी बहीण योजना’ मध्ये मोठे बदल आता फक्त या कागदपत्राची गरज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Update :- महाराष्ट्र सरकारने नुकतीच लाडकी बहीण योजना महाराष्ट्र मध्ये राबवली आहे. सध्या या योजनेच्य चर्चा महाराष्ट्रभर जोरात सुरू आहे. महिलांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सेंटर मध्ये धाव घेतली आहे त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयात देखील गर्दी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यातच महाराष्ट्र सरकारने या योजनेमध्ये बदल केले आहे. आता या योजनेसाठी फक्त याच कागदपत्राची गरज पडणार आहे. सरकारने महिलांना एक मोठी बातमी दिली आहे.

लाडकी बहीण योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

‘माझी लाडकी बहीण ’योजना अंतर्गत महिलांना दरमा 1500 रुपये देण्यात येणार आहे. या योजनेला अर्ज करण्यासाठी पात्र महिलांना कागदपत्राच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. पण कागदपत्रे बनवण्यासाठी राज्यभर तहसील कार्यालयात महिलांची जास्त प्रमाणात गर्दी पाहता राज्य सरकारने या योजनेबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.Ladki Bahin Yojana Update

राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये शितलता दिली आहे. म्हणजेच आता ज्या महिलेकडे डोमासाईल म्हणजे आदिवासी दाखला नाही त्या महिलेकडे पंधरा वर्षे पूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र त्याचबरोबर शाळा सोडण्याचा दाखला किंवा जन्मदाखला यापैकी एकेक कागदपत्र राहील तरी त्या महिलांनी या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! नमो शेतकरी योजनेची यादी जाहीर, या शेतकऱ्यांना मिळणार नाही चौथ्या हप्त्याचे 2000 रुपये..

त्याच बरोबर या योजनेला अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै ही ठेवण्यात आली होती. पण आता राज्य सरकारने ही मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे म्हणजेच आता राज्यातील महिलांना या योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. राज्य सरकारने केलेल्या घोषणामुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही. महिलांसाठीही आनंदाची बातमी आहे.

सरकारने केले हे नवीन बदल :

  • मुदतवाढ : योजनेला अर्ज करण्याची मुदत 1 जुलै ते 15 जुलै ठेवण्यात आली होती, परंतु आता ही मुदत वाढ दोन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. म्हणजे आता ‘लाडकी बहिन’ योजनेला अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 केली आहे.
  • या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र हे आवश्यक होते. परंतु आता लाभार्थी महिलेकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षे पर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडण्याचा दाखला, जन्म दाखला, यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र असेल तर त्या महिलेला या योजनेला अर्ज करता येणार आहे.
  • सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेचा वयोगट 21 ते 60 वर्ष होता. यामध्ये आता 21 ते 65 वर्षे वयोगट करण्यात आला आहे.
  • जर कुटुंबामधील एखादी अविवाहित महिला सुद्धा या योजनेला अर्ज करता येणार आहे.

योजनेला अर्ज कुठे करायचा :

तुम्ही या योजनेला अर्ज आपले सरकार ऑनलाइन केंद्रामध्ये करू शकता. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी देखील करू शकता. सर्व महत्वपूर्ण कागदपत्रे तुम्ही आपल्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये जमा करावेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “मोठी बातमी ‘लाडकी बहीण योजना’ मध्ये मोठे बदल आता फक्त या कागदपत्राची गरज”

Leave a Comment

error: Content is protected !!